नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ, कोसारा येथील रेती घाटावर अवैध रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. यात प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून रोज रात्री या दोन्ही घाटांवर सर्रासपणे रेती तस्करी होत आहे. यात शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत असताना जणू काही हे दोन्ही घाट रेती तस्करांसाठी मोकाट तर सोडले नाही ना असेही बोलले जात आहे.
चिंचमंडळ, कोसारा घाट वगळता तालुक्यातील केवळ आपटी रेती घाट लिलाव झाला आहे. त्यामुळे चिंचमडल, कोसारा रेती घाटावर रेती तस्करांनी आपले डोके वर काढले आहे. या दोन्ही घाटांवर “खेळ रात्रीचा” चालत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही रेती घाटांवर रेती तस्करांनी रेतीचा अवैधरीत्या उपसा करून ट्रॅक्टरद्वारे रेतीची तस्करी करत आहे. मात्र यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने हा घाट रेती तस्करांसाठी मोकाट तर सोडला नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोसारा रेती घाटावर खैरी, चिंचमडळ, कोसारा, मारेगाव येथील तर चिंचमडळ घाटावर खैरगाव, चिंचमडळ येथील तस्कर रात्रीच्या वेळी या नदी पात्रातील अवैधरीत्या रेतीचा उपसा करत ट्रॅकटरद्वारे तस्करी करत आहे. अवैधरीत्या उत्खनन होत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
या दोन्ही घाटांवरून रेतीची अवैधरीत्या ट्रॅकटरद्वारे तस्करी होत असताना यावर मारेगाव प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाधिकारी महोदयांनी यावर लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा