जब्बार चीनी, वणी:आजचा दिवस तालुकावासियांसाठी दिलासादायक ठरला. आज सोमवारी दिनांक 31 मे रोजी तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आज 32 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. याशिवाय ऍक्टिव्ह रुग्णसंख्या देखील महिनाभरानंतर शंभरच्या खाली आली. अशी तिहेरी खुशखबर एकाच दिवसात मिळाली आहे. सध्या तालुक्यात 95 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान आज दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कडक लॉकडाऊन व अधिकाधिक टेस्टचा परिणाम तालुक्यात दिसून आला आहे.
आज यवतमाळ येथून एकही रिपोर्ट आले नसले तरी आज 80 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 66 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 196 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 95 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 17 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 61 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 17 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5224 रुग्ण आढळून आलेत. यातील 5037 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 92 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
रुग्णसंख्येचा दर आज शुन्य..
आज यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नसला तरी रॅपिड ऍन्टिजन केलेल्या सर्व 80 टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. काल देखील 49 रॅपिड ऍन्टिजन टेस्टपैकी सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. सलग दुस-या दिवशीही ऍन्टिजन टेस्टमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. शिवाय आज ऍक्टिव्ह रुग्णसंख्या देखील 100 च्या आत आली आहे. ही तालुक्यासाठी एक दिलासादायक बाब आहे. दरम्यान आता ग्रामीण भागातही कोरोनाचे थैमान कमी होताना दिसत आहे. त्यामुळे लवकर तालुका कोरोनामुक्त होण्याची आशा बळावली आहे.
हे देखील वाचा: