मारेगाव शहर कोरोनामुक्तीकडे, ग्रामीण भागात थोडा संसर्ग सुरू

आज 6 पॉझिटिव्ह, दिवसेंदिवस घटतये कोरोनाची रुग्णसंख्या

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 1 जून रोजी तालुक्यात केवळ 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 3 महिला व 3 पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 23 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज 312 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट यवतमाळ येथे वरून प्राप्त झाले. यात 5 पॉझिटिव्ह आढळलेत. तर आज 15 संशयीतांची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात एक पॉझिटिव्ह आढळला आहे. असे एकूण 6 पॉझिटिव्ह आज आढळलेत. अद्याप 232 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या 84 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 18 रुग्ण उपचार घेत आहे तर 56 होम आयसोलेट आहे. डेडीकेटे़ड कोविड हेल्थ सेंटरवर 5 तर 5 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

हे देखील वाचा:

एकल दुकानामुळे उडाला गोंधळ, एकल दुकाने म्हणजे काय?

तालुक्याची कोरोनामुक्ती झपाट्याने वाटचाल, आज 3 रुग्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.