बांम्बर्डा गावाला जोडणाऱ्या पुलाची अवस्था जीर्ण
पावसामुळे दरवर्षी तुटतो गावाचा संपर्क, पाणी शेतात घुसून होते शेतकंऱ्याचे नुकसान
नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील बांम्बर्डा गावाला जोडणाऱ्या मुख्य पुलाची अवस्था जीर्ण झाली असून पुलाची एक बाजू खचलेली आहे.पुलाचे खोलीकरण कमी असल्यामुळे पावसाळ्यात तर या पुलावरून पुराचे पाणी धो-धो वाहत असल्याने दरवर्षी गावाचा नेहमी संपर्क तुटत असतो.
तसेच पावसाळ्यात पुराचे पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत असते.ही बाब ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली असता यावर दुर्लक्ष होत आहे. मात्र ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील मार्डी गावापासून 3 की.मी.अंतरावर वसलेले बांम्बर्डा हे गाव आहे. गावाला जोडणारा मुख्य पूल हा गेल्या अनेक वर्षा पासून जीर्ण होऊन पुलाची एक बाजू खचलेली आहे. येत्या दहा दिवसात पावसाळा सुरु होत आहे. पुलाचे खोलीकरण कमी असल्यामुळे पावसाचे पाणी पुलावरून वाहत थेट परिसरातील शेतात जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पावसाळ्यामध्ये पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटतो बाजार घेण्यासाठी, दवाखाना, कॉलेज आदी कामासाठी गेलेल्या नागरिकांना मार्डी येथे बस स्टापवरच आपला मुकाम ठोकावा लागतो.
पुलाची खोलीकरण कमी असल्याने पावसाचे पाणी दरवर्षी शेतात जाऊन पिकाची हानी होते. जवळपास 20 ते 30 शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होते.पावसाळ्यात अतिआवश्यक कामाकरिता बाहेर गावाला जाणे शक्य नसल्याने बिमार रुग्णाचा तर प्राणपण जाऊ शकतो.
अशी वेळ बांम्बर्डा वासीयांवर आली आहे.मात्र यावर लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांनी या जीर्ण पुलाच्या कामाची मागणी लोकप्रतिनिधी सह प्रशासन दरबारी केली आहे.
हेदेखील वाचा
बोपापूर व गणेशपूर (खडकी) येथील मंजूर RO प्लान्टचे खुले टेंडर काढा
हेदेखील वाचा
तालुक्यातील 45 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांनी कोविड लस घ्यावी
हेदेखील वाचा