नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू झाली आहे. आज 6 जून रोजी तालुक्यात अवघा एक रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय दुसरीकडे तालुक्यातील 11 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. आता तालुक्यात अवघे 19 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. चार दिवसांआधी तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 60 पेक्षा अधिक होती. मात्र झपाट्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू होत असल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे.
आज आरोग्य विभागाने 4 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात एक पॉझिटिव्ह आला आहे. तसेच आज 22 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट केली असून ते रिपोर्ट यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले आहे. अद्याप 63 संशयीतांचे रिपोर्ट पेंडिंग आहे.
तालुक्यात आता अवघे 19 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 15 रुग्ण कोविड सेंटरवर उपचार घेत आहे तर 2 होम आयसोलेट आहे. डेडीके़टेड कोविड हेल्थ सेंटरवर 2 रुग्ण उपचार घेत आहे. आता तालुक्यात अवघे 19 रुग्ण उरल्याने तालुक्याची कोरोनामुक्ती वाटचाल सुरू झाली असेच म्हणावे लागेल.
हे देखील वाचा:
तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात