सुशील ओझा, झरी: शासनाने लॉकडाऊन खुले करताच जनतेच्या तोंडावरील मास्क गायब झाले. त्यामुळे पुन्हा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम मोडणा-या दुकानदारांसह सर्वसामान्यांवरही कारवाई होईल का असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शासनाने सर्व दुकानदार व जनतेला नियम पाळूनच खरेदी किंवा विक्री करावे अन्यथा दुकानदार व जनतेवर कार्यवाही करणार असल्याचे आदेश असतांना सुद्धा सर्वच दुकानात, भाजीपाला, पानटपरी, चहा कॅन्टिन, हेअर सलून, कापड दुकान, हार्डवेअर, जनरल स्टोअर्स, मोबाईल शॉपी, बियरबार व देशी दरच्या दुकानात प्रचंड गर्दी उसळली आहे. इतर ठिकाणी फुल्ल गर्दी करून खरेदी सुरू आहे.
90 टक्के लोकांच्या तोंडावरील मास्क गायब झाले आहे. सोशल डिस्टनसिग फज्जा उडाला आहे. त्यामुळं कोरोना रुग्णांचा प्रसार वाढण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाऊन उघडल्याने कोरोनाचा धोका संपल्या सारखे जनता वावरत आहे. या करिता शासनाने कडक पाऊल उचलून गर्दी कमी करावे जेणे करून कोरोनाचा प्रसार होणार नाही तसेच जनतेत शासनाच्या नियमबाबत जनजागृती करावी.
कोरोनाचे रुग्ण कमी व्हावे याकरिता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकान व्यतिरिक इतर दुकानांना उघडण्यास बंदी ठेवण्यात आली होती. एक महिन्याच्या लॉकडाऊन मुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात किरोना रुग्णाची संख्या कमी होऊन रुग्ण बरे होणाऱ्याची संख्या जास्त प्रमाणात झाली. ज्यामुळे शासनाने लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला व एक आठवडा पूर्वी शासनाद्वारा लॉकडाऊन उठविण्यात आला. मात्र व्यापा-यांसह ग्राहकही लॉकडाऊनचे नियमांना हरताळ फासताना दिसून येत आहे.
हे देखील वाचा: