चारगाव चौकी ते ढाकोरी मार्गावर जागोजागी खड्डे
जीव मुठीत धरून प्रवास, रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा
विवेक पिदूरकर, शिरपूर: चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणा-यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील खड्यामुळे नेहमीच दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात होतात. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे वैभव कवरासे यांनी उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदन दिले.
वणी ते कोरपना या रस्यावर चारगाव चौकी ते आबई फाटा व आबई फाटा ते ढाकोरी दरम्यान 100 फुटाच्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी 2 ते अडीच फुटाचे मोठ मोठे खड्डे पडले आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू झाल्याने त्या खड्यात पाणी गेले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
मुख्यत: वणी तसेच चंद्रपूर, कोरपना इत्यादी साठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. शिवाय शिरपूर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, वणीची बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. मात्र इथे असलेल्या खड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.
याबाबत आज सोमवारी वैभव कवरासे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनातून त्यांनी तातडीने यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. जर रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर न बुजवल्यास गावक-यांसह आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला आहे.
हे देखील वाचा:
[…] […]