कोरोनाकाळात मृत पालकांच्या पाल्यांना मोफत कोचिंग

आवारी ट्युटोरियल्सचे प्रा, घनश्याम आवारी यांचा स्तुत्य उपक्रम

0

जितेंद्र कोठारी,  प्रतिनिधी: कोरोनाकाळात अनाथ झालेल्या पाल्यांना मोफत कोचिंग (ट्युशन्स) देण्याचा निर्णय प्रा. घनश्याम आवारी यांनी घेतला आहे. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. अशा विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा संकल्प प्रा. घनश्याम आवारी यांनी केला आहे. ते वणीतील आवारी ट्यूटोरियलचे संचालक आहेत. त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे

प्रा. घनश्याम आवारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ही मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोचिंग देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगारदेखील गेलेत. अशा पालकांच्या पाल्यांनाही काही प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये हा उदात्त हेतू घनश्याम आवारी यांचा आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या पालकांच्या विद्यार्थी पाल्यांना जेईई आणि नीट या परीक्षांसाठीसुद्धा मार्गदर्शन केले जाईल. त्या सोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक ती शैक्षणिक मदत आवारी ट्युटोरियल्सकडून केली जाईल. या संधीचा संबंधित विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीकरिता 9860915024 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती आवारी ट्युटोरियल्सच्या वतीने करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा

शेतीचे काम करणा-या शेतक-यावर रानडुकराचा हल्ला

हेदेखील वाचा

अवैध खतसाठा केलेल्या गोडाऊनवर धाड, 15 लाखांचे खत जप्त

हेदेखील वाचा

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

Leave A Reply

Your email address will not be published.