खडकी ते अडेगाव रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य
रस्ता दुरुस्त न झाल्यास मंगेश पाचभाईंचा आंदोलनाचा इशारा
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठं गाव असलेले अडेगावकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचले आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. अडेगाव शिवारात चार डोलामाईड खदानी आहेत खदान मधील दगड व रेती मुरमाची ओवरलोड वाहतुम सुरुवासल्याने अडेगाव -खडकी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे खडकी ते अडेगाव मार्ग पूर्ण खड्डेमय झाला आहे. अनेक छोटे पूल तुटलेल्या अवस्थेत आहे. या मार्गावरील अडेगाव, खातेर, येडद, अमलोन, तेजापूर, गाडेगात गावातील शेकडो नागरिकांना खड्डेमय रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याच मार्गावरील खातेरा नदीवर दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भविष्यात याच मार्गावरून चंद्रपूर व तेलंगणात मोठया प्रमाणात वाहतूक सुरू होणार आहे. सदर रस्त्याची अवस्था बिकट होत चालली आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
रस्त्याची बिकट परिस्थिती व जनतेचा रोष बघता सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी खडकी ते अडेगाव मार्गावरील खड्डे बुजवून त्वरीत रस्ता दुरुस्त करावे अशी मागणी बांधकाम विभागाकडे रेटून धरली व उपविभागीय बांधकाम अभियंता याना 15 जून रोजी लेखी निवेदन देत रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली.
रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास बांधकाम कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी गणेश पेटकर ,राहुल ठाकूर,विजय लालसरे आदी सहकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: