ग्रामपंचायत सदस्य असलेली आशा स्वयंसेविका पदावरून कार्यमुक्त

परवानगी न घेता घेता निवडणूक लढविने व माहिती न देणे भोवले

0

सुशील ओझा, झरी: आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत निवडणूक लढविणे व निवडून आल्यानंतर त्याची कोणतीही माहिती संबंधीत विभागाला न दिल्याने अडेगाव येथील आशावर्कर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मुकुटबन आरोग्य विभाग अंतर्गत अडेगाव येथील गंगा काटकर नामक महिला गेल्या अनेक वर्षांपासून आशा स्वयंसेविका म्हणून काम करत होत्या.

15 जानेवारी 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत गंगा काटकर ह्या उभ्या राहिल्या व निवडून देखील आल्या. त्या 22 फेब्रुवारी पासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत झाल्या. दरम्यान आशा स्वयंसेविका असताना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याबाबत गंगा काटकर यांनी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतली नाही तसेच निवडून असल्यानंतर त्याबाबत कळविलेही नाही.

शासन परीपत्रक नुसार एका व्यक्तीला दोन पदावर काम करता येत नाही. कोणत्याही एका पदावर काम करण्याबाबत वैद्यकीय अधिकारी मार्फत संदर्भ क्र (3) व (4) नुसार कळविण्यात आले होते. परंतु काटकर यांनी पत्र न स्वीकारता परत पाठविल्याने वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचे निदर्शनात आले. तसेच सदर आशावर्करने कोरोना काळात कोणतीही सेवा दिली नाही. याबाबत पत्रव्यवहार केला असता त्याला देखील प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गंगा काटकर याना कार्यमुक्त केले. ग्रामपंचायत सदस्य पदावर निवडून आल्यानंतर आशा स्वयंसेवीका पदावरून हटविण्याकरिता अडेगावातीलच समाजसेवक मंगेश पाचभाई यांनीसुद्धा तक्रार केली होती.

हे देखील वाचा:

धडाकेबाज कारवाई करणा-या विशेष पोलीस पथकाचे अवघ्या 22 दिवसातच विसर्जन

सावधान: कोरोनाचे नियम मोडाल तर खिशाला पडेल भुर्दंड

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.