पथनाट्याद्वारा गावागावात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती

आरसीसीपीएल व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, लस घेण्याचे केले आवाहन

0

सुशील ओझा, झरी: शासनाने कोविड 19 ची लस घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनी व मुकुटबन, अडेगाव, पिंप्रडवाडी, येडशी, पिंप्रड यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लशीबाबत जनजागृती कारण्याचे काम हाती घेण्यात आले. या निमित्ताने सरपंच सचिव व सदस्य यांच्या मार्गदर्शनात 24 ते 26 जून या तीन दिवसांत मुकुटबन, अडेगाव, पिंप्रडवाडी, येडशी, पिंप्रड या गावात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी महिला डॉक्टरांनी गावक-यांना मार्गदर्शन केले.

सध्या झरी तालुक्यात ‘माझे लसीकरण, माझे संरक्षण…’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्ग गावोगावी जाऊन घरोघरी लसीबाबत माहिती देणे तसेच जनजागृतीचे काम सुरू आहे. तसेच लसीबाबत कोणतीही भीती न बाळगता लसीकरणच हाच एक कोरोनापासून बचाव करण्याचा उपाय असल्याने प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे असे आवाहन यावेळी जनजगृती करणा-या पथकाने केले.

ग्रामीण भागातील जनतेत कोविड लसीबाबत विविध शंका निर्माण झाल्याने लसीकरण कमी प्रमाणात होत आहे. अश्या लोकांच्या मनातील शंका दूर करून लस घेण्याकरिता जनजागृती करण्याचे व जनतेला लस घेण्यास प्रवृत्त करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, ब्लॉक मिशन व्यवस्थापन व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

वणीतील विश्वशांती बुध्द विहार येथे जेष्ठ पौर्णिमा साजरी

कवी प्रदीप बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.