पुरुषोत्तम नवघरे, वणी: 1 जुलै राजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. “एक जवान, एक वृक्ष” या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात आला. वड, पिंपळ, कडूनिंब, उंबर, सीताफळ इ. झाडांची लागवड केली टीडीआरफद्वारा करण्यात आली. TDRF चे संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात आला.
वणी, मारेगाव, झरी परिसरात टीडीआरएफच्या जवानांनी मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही अशा माळावर विविध वृक्ष लावले व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला. यावेळी TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस कार्यरत होते. उपक्रमाच्या TDRF च्या मुस्कान सय्यद, गणेश बुरांडे, ऋचा दारूंडे, मनीष आवारी, संजना देवगडे, रवीना कौरासे, बिंदिया उईके, चेतन उलमाले, समीक्षा देऊळकर, आचल झिले, अनुष्का नक्षणे, काजल वाळके, नयन उरकुडे, माहेश्वरी राजपूत यांच्यासह टीडीआरएफच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
TDRF ही संस्था आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या वर्षीपासून ही संघटना लॉकडाऊन काळात कोरोनाबाबत जनजागृती करीत आहे. सध्या या संस्थेद्वारा कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम सुरू आहे.
हे देखील वाचा: