विविध मागण्यांसाठी कोतवाल संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
कोतवालांच्या अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित
भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या अनेक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी कोतवाल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या आणि कोतवालांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या मारेगाव तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले. याबाबत मारेगाव तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
प्रशासनाचा गाव पातळीवरील मुख्य दुवा म्हणजे कोतवाल. तहसील परिसरात कोतवाल भवनासाठी जागा उपलब्ध करून देणे, मयत व निवृत्ती कोतवालांचे अर्जित रजेची वाढीव रक्कम देणे, दरमाहा 100 रुपये लढा निधी कापून संघटनेच्या खात्यात जमा करणे इत्यादी मागण्या गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागण्यांसाठी कोतवाल संघटनेद्वारा तहसीलदार यांना देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशी निमसटकर, तालुका अध्यक्ष सुरेश येरमे, गणेश उराडे, अतुल बोबडे, विनोद मडावी, बळवंत कोवे, अशोक पेंदोर, संदीप कुळसंगे, अनिल येरमे, योगेश भट, दिलीप पचारे, बंडू लोखंडे आदी कोतवाल उपस्थीत होते.
हे देखील वाचा: