भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आज सकाळी 11 ते 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दिनकर पुंडलिक बोन्दरे (55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
दिनकर बोन्दरे हे गोंडबुरांडा येथील रहिवाशी होते. यांच्याकडे 15 एकर शेती होती. यावर्षी पावसाने दिलेला दगा दिल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यामुळे त्यांनी खासगी सावकारांचे कर्ज घेतले होते. अखेर कर्जाला कंटाळून त्यांनी स्वतःच्या घरी सकाळी 11 ते 11.30 वाजताच्या दरम्यान मोनोसिल हे कीटकनाशक घेतले.
कीटकनाशक घेतल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दिनकर बोन्दरे हे स्वभावाने सर्वांशी मिळून मिसळून राहणारे होते. यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामागे म्हातारी आई, पत्नी आणि दोन मुले असा आप्तपरिवार आहेत.
मारेगाव तालुका हा आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून कुप्रसिद्ध आहेत. दोन ते तीन दिवसाआड एकतरी आत्महत्या या तालुक्यामध्ये होत असते. मात्र अद्याप ही बाब ना लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेतली आहे ना प्रशासनाने.
हे देखील वाचा: