आवडीचा ब्रँड आणून न दिल्याचा जाब विचारल्याने बार मालकाची ग्राहकाला मारहाण

ग्राहकाला मारहाणीत दुखापत, बारमालकाविरोधात गुन्हा दाखल.

0

विवेक तोटेवार, वणी: श्रमपरिहार म्हणून दोघे मित्र बारमध्ये गेले. तिथे ग्राहकाने आपल्या आवडीच्या ब्रँडच्या दारुची ऑर्डर केली. मात्र वेटरने त्यांना दुसरा ब्रँड दिला. बस हेच कारण ठरले वादाचे व त्यावरून बार मालकाने ग्राहकाला मारहाण केली. शुक्रवारी दिनांक 9 जुलै रोजी ही घटना घडली.

Birthday

तक्रारीनुसार, फिर्यादी शाम हा त्याचा मित्र राजूसोबत शुक्रवारी वणीतील वरोरा रोडवरील ज्योती बार या बारमध्ये गेला. राजूने वेटरला आरएस (व्हिस्की) व व्होडका याची ऑर्डर दिली. मात्र वेटरने आरएस ऐवजी ओसी ही दारू आणून दिली. याबाबत त्यांनी वेटरला विचारणा केली असता वेटरने त्यांना मालकाला विचारा असे  सांगितले.

राजू हा काऊंटरवर बार मालक मनोज उरकुडे (36) रा. माळीपुरा याला विचारणा करायला गेला असता त्यावर ग्राहकांचे समाधान झाले नाही. त्यातून वाद वाढला व बारमालकाने राजूच्या थोबाडीत लावली. मार खाल्यानंतर दोघेही बारमधून बाहेर आले. ते दुचाकी काढत असताना बारमालक तिथे आला व त्याने फिर्यादीच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे शाम खाली पडला. तिथे बारमालकाने शामला मारहाण करत इथून लवकर निघा म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या मारहाणीत शामच्या डोळ्याला व पायाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी शामच्या तक्रारीवरून आरोपी मनोज उरकुडे याच्याविरोधात भादंविच्या कलम 325 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात वासुदेव नारनवरे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

कारची म्हशींना जोरदार धडक, तीन म्हैस जागीच ठार

रात्री 11 वाजता अविनाश लेनगुरेवर अंत्यसंस्कार

Leave A Reply

Your email address will not be published.