शुल्लक वादावरून दोन भावांमध्ये जुंपली, एकमेकांवर काठीने प्रहार

वेळद येथील घटना, परस्पर विरोधात तक्रार दाखल

0

सुशील ओझा, झरी: शुल्लक वादातून एका भावाने दुस-या भावाला काठीने मारहाण केली. ही घटना तालक्यातील वेळद येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही भावांनी एकमेकांविरोधात मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

देविदास विठ्ठल टोंगे (36) याच्या तक्रारीनुसार, देविदास हा येळद या गावात राहतो. तो शेती करतो. त्यांचा लहान भाऊ रामदास विठ्ठल टोंगे हा देखील गावतच वडिलांसह राहतो. तो देखील शेती करतो. रामदास हा नेहमीच दारूच्या नशेत शिविगाळ करतो असा देविदासचा आरोप आहे.

शनिवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास देविदास शेतात फवारणी करण्यासाठी जाणार होता. त्यामुळे तो फवारणीची तयारी करीत होता. 3.30 वाजताच्या दरम्यान रामदासने देविदासच्या बैलगाडीच्या चाकाची खिरडी काढली. यावरून देविदासने विचारणा केली असता या दोन्ही भावात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रामदासने मोठ्या भावाच्या डोक्यावर रॉडने प्रहार केला व जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान त्यांचे सासरे हरी पाटील मालेकर हे तिथे पोहोचले व त्यांनी देखील देविदासला लाथाबुक्यांनी मारहाण केली.

रामदास विठ्ठल टोंगे याच्या तक्रारीनुसार, दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास रामदास त्यांच्या चुलत भावाशी बोलत होता. दरम्यान त्यांचा मोठा भाऊ देविदास अचानक पाठी मागून हातात खुरपा लावलेली काठी घेऊन आला व त्याने रामदासच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. या मारहाणीत रामदासचे डोके फुटले. 

झालेल्या प्रकारावरून दोन्ही भावाने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठत एकमेकांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही तक्रारीवरून आरोपींचे मेडिकल करून आरोपी रामदास व आरोपी देविदास विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात जमादार मोहन कुडमेथे करीत आहे.

हे देखील वाचा:

आवडीचा ब्रँड आणून न दिल्याचा जाब विचारल्याने बार मालकाची ग्राहकाला मारहाण

 

Leave A Reply

Your email address will not be published.