भेंडाळा गावातील वार्ड क्र 3 चा पाणीपुरवठा बंद
4 महिन्यांपासून पाण्याची समस्या सुरू, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा गावातील 10 कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यांपासून पाणीपुरवठा होत नाही. याबाबत 17 एप्रिल 2021 रोजी ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप आहे. ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
भेंडाळा गावातील वॉर्ड क्र 3 मधील 10 कुटुंबांना रोजच्या कामाकरिता पाणी मिळत नाहीये. 4 महिने लोटूनही ग्रामपंचायतीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. अखेर 17 जुलै रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा करण्यास विनंती केली. वॉर्ड क्र 3 मध्ये बोअर मारलेला आहे. त्या बोअरला मोटर लावून पाईप लाईन जोडल्यास पाण्याची समस्या सुटू शकते.
वॉर्ड क्र 3 ची पाईप लाईन बोअरवेलला जोडून पाणीपुरवठा करण्याची मागणी संजय धांडे, दादाजी झाडे, बेबी गोडे, दुर्वास निब्रड, संतोष पानघाटे, मारोती पेटकर, हरिदास धांडे, पूजा घोडे, सुनीता डाखरे व रुंदा निब्रड यांनी केली आहे.
हे देखील वाचा:
स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास