सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी पकडून कार्यवाही केली आहे. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 9 वाजता दरम्यान पिंपरड मार्गाने अरविंद धरणीवार नामक युवक दारूच्या 48 शिष्या किंमत 2880 घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपी अरविंद याला पकडून पोलीस स्टेशनला आणले.
गावातीलच रघु झाडे याच्या घरी दारूसाठा असल्याच्या माहीतीवरून पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्याच्या घरून 90 देशी दारूच्या शिष्या आढळून आल्या ज्याची किंमत 5400 रुपये आहे. असा एकूण एकूण 8280 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व दोघांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रवीण तालकोकुलवार,अशोक नैताम व मंगेश सलाम यांनी केली.
तत्कालीन ठाणेदार यांच्या कार्यकाळात मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत मुकुटबन, अडेगाव, साखरा, घोंसा, बोपापूर, खडकडोह, गणेशपूर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री, मटका, ओव्हरलोड वाहतूक, अवैध वाहतूक, रेती, गुटखा, जनावर तस्करी, अवैध डिझल पेट्रोल तस्करी, अवैध ब्लास्टिंग, कोळसा तस्करी व विकी मोठ्या प्रमाणात वाढली होती.
तसेच चंद्रपूर व तेलंगणात दारू तस्करी व पैनगंगा नदीच्या तीन घाटावर अवैध दारू विक्री सुरू होती. ठाणेदार व काही कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे अवैध धंदेवाल्यांची दादागिरी वाढली होती. ती आता खपवून घेणार नाही व अश्या अवैध व्यवसायकाना वठणीवर आणणार अशी भूमिका नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी घेतली आहे.
संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. याच अनुषंगाने पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. 3 ऑगस्टला साखरा येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पकडले होते.
हे देखील वाचा: