मुकुटबन पोलीस ठाण्यात वृक्षारोपण 

वृक्ष देऊन करण्यात आला नवीन ठाणेदारांचा सत्कार

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये नवीन रुजू झालेले ठाणेदार अजित जाधव यांचे सर्पमित्र व शिक्षक मनवर व मित्र परिवारानी वृक्ष देऊन सत्कार केला. यावेळी पोलीस स्टेशनच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. जीवनात प्रत्येक व्यक्तीने एक झाड लाऊन त्याचे संगोपन केल्यास संपूर्ण देश प्रदूषण मुक्त होणार असे विचार ठाणेदार जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, खुशाल सुरपाम, शशिकांत नागरगोजे, जितेश पानघाटे, सर्पमित्र मनवर उपस्थित होते.

 

रविंद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पुरुषोत्तम नवघरे. वणी: महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ संलग्र भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष अविनाश भुजबलराव यांच्या हस्ते रवींद्रनाथ टागोर यांना यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यावेळी मुकुंद सोयाम, अतुल बनसोड, सुभाष राठोड ,अनंत सारडे, सामित भुजबलराव,साकेत भुजबलराव,सतीश जोगी,संदीप तारगे, अजय चन्ने, करण राजपूत, अर्जुन राजपूत ,चेतन वाघमारे,मारुती पुनवटकर,अजय मोहरलेव समस्त कर्मचारी व पदाधिकारी कामगार सेनेचे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.