सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील एका कंपनीत लावलेली कार घेऊन चक्क चालकच फरार झाला आहे. दोन महिन्यापासून चालकाने कार आणून न दिल्यामुळे अखेर कार मालकाने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली आहे. सदर कारचालक हा परप्रांतीय असून तो कंपनीत लावलेल्या गाडीचा चालक आहे.
आरसीसीपीएल कंपनीमध्ये केईसी इंटरनॅशनल श्री गणेश साई प्लास्टर कंपनीला वाहतुकीसाठी गाडीचे काम आउटसोर्स केले आहे. या कंपनीत राजकुमार उर्फ कमलेश त्रिपाठी (23) रा. कोटूरा जिल्हा बलरामपूर उत्तरप्रदेश हा काम करायचा. त्याने मुकुटबन येथील शंकर सीताराम मोरलेवार यांची स्कॉर्पिओ ही कार 22 हजार रुपये महिन्याप्रमाने भाड्याने घेऊन कंपनीत लावली.
याबाबत दोन पंचासमक्ष 8 जून 2021 रोजी भाडेतत्वाचा करार झाला. तीन महिन्यासाठी सदर गाडी देण्यात आली होती. त्यासाठी 22 हजार रुपये ऍडवॉन्सही दिले. तसेच सदर गाडी फक्त कंपणीत व कंपनीच्या कामासाठीच वापरली जावी असा करारनाम्यात नमुदही करण्यात आले होते.
10 जून रोजी राजकुमार त्रिपाठी हा गाडीमालक शंकर मोरलेवार याला कोणतीही कल्पना न देता स्कॉर्पिओ गाडी उत्तरप्रदेशात घेऊन गेला. दरम्यान गाडी दिसत नसल्याने गाडीमालकाने राजकुमार याला मोबाईलवर कॉल करून गाडीबाबत विचारणा केली तर आज परत आणतो उद्या परत आणतो असे उडवाउडवीची उत्तरे दिली.
सदर चारचाकी वाहन विकल्याची किंवा गहाण ठेवल्याचा संशय गाडीमालकास आला. त्यामुळे त्यांनी कंपनीतील जीएम यांना गाडीबाबत विचारणा केली असता. त्यांनी गाडी परत देणे माझी जवाबदारी आहे. तसेच गाडी परत न आल्यास प्रसंगी गाडीची रक्कम देणे हे देखील जबाबदारी असल्याचे सांगत वेळ मारून नेली.
मात्र गाडीबाबत काहीही पत्ता लागला नाही शिवाय गा़डीही परत आली नाही. अखेर गाडीमालक शंकर सीताराम मोरलेवार यांनी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठत चालकाविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचा ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात मुकुटबन पोलीस तपास करीत आहे.
हे देखील वाचा:
वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू