गणेश धानोरकर यांची बारी समाज संघटना अध्यक्षपदी निवड
जितेंद्र कोठारी, वणी: येथील गणेश बबनराव धानोरकर यांची निवड वणी विधानसभा बारी समाज संघटनांच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. बारी समाज पुस्तक प्रकाशन समितीचे अध्यक्ष हेमंत साने यांच्या उपस्थितीत दि. 7 ऑगस्ट 2021 रोजी वणी येथे आयोजित बैठकीत गणेश धानोरकर याना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या बैठकीत निलेश विठ्ठलराव होले व प्रवीण वामनराव सावळकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे सचिव पदावर राम नारायण मुडे, सहसचिव अमोल मारोतराव धानोरकर व कोषाध्यक्ष पदावर विजय सुभाषराव राऊत यांची एकमताने निवड करण्यात आली.
वणी विधानसभा क्षेत्रात बारी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी निस्वार्थ झटणार असल्याचे मनोगत यावेळी नवनियुक्त अध्यक्ष गणेश धानोरकर यांनी व्यक्त केले.