लालगुडा चौपाटी जवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात

पीकअप मधील 3 जण गंभीर, कारमधील सर्व प्रवासी मात्र सुदैवाने वाचले

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी घुग्गुस राज्य मार्गावर लालगुडा चौपाटी जवळ रविवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान 3 वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप बोलेरो वाहनाचे चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. तर अपघातास कारणीभूत कोळसा ट्रकचा चालक दुर्घटनेनंतर वाहन सोडून पळून गेला. तर ट्रकच्या बाजूने येणाऱ्या प्रवासी कारमधील सर्व प्रवासी सुदैवाने वाचले. मात्र कारला ठोस लागल्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दुर्घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी होऊन राज्यमार्गवर वाहतूक कोंडी झाली होती. वणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली व पिकअप वाहनमधील जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथील एक कुटुंब व (MH34BR8688) क्रमांकाच्या कारने वणीकडे येत होता. सायंकाळी 5 वाजता लालगुडा ते बामणी फाटा दरम्यान कारच्या मागून भरधाव आलेले MH49- 1218 क्रमांकाच्या ट्रकने कारला ओव्हरटेक करून अचानक मोडी घेतली. त्यामुळे जोराने ब्रेक लावूनही कार ट्रक वर आदळली. तर ट्रकने डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला विपरीत दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली.

ट्रक व पिकअपच्या धडकेत पिकअप वाहनामधील चालक व त्याच्या बाजूला बसलेले 2 जण गंभीर जखमी झाले. पिकअप जीपला धडक देऊन ट्रक रस्त्याच्या खाली उतरला व खुल्या जागेवर जाऊन थांबला.दोन वाहनाला धडक देणाऱ्या ट्रक चालक दुर्घटनेनंतर घटनास्थळवरून पसार झाला. 

Leave A Reply

Your email address will not be published.