अडेगाव येथील शिबिरात 600 रुग्णाने केली नेत्र तपासणी 

मंगेश पाचभाई यांच्यातर्फे शिबिराचे आयोजन

0
सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे , पादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे .असे असले तरी शहरी भागातील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसून मात्र ग्रामीण भागातील नागरिक शिस्तीचे पालन करत आहे.
अडेगाव येथील नेत्रतपासणी शिबिरामध्ये मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली 18 ऑगस्ट रोजी अडेगाव येथील दत्त मंदिरात नेत्र व इतर तपासणीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णांना मास्क लावत कोरोना काळातील सर्व नियम व अटींचे पालन करीत शिबिर पार पडले. शिबिरात 600 रुग्णांनी नेत्र तपासणी  लाभ घेतला.  100 रुग्णांना सावंगी मेघे रुग्णालयात शत्रक्रिया करण्यासाठी  23 ऑगस्टला रुग्णांना नेण्यात येणार आहे. 
युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले मंगेश पाचभाई हे अडेगाव सह तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्या करिता नेहमी धावणारा युवा असून त्यांनी गोरगरीब जनतेचे अनेक समाश्या सोडविल्या आहे. असेच चांगले उद्देश ठेऊन ह्या शिबिराचे आयोजन करण्याचे आले.
         
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व गावाचे सरपंच सौ.सीमाताई लालसरे सोबत इतर ग्रा.प.सदस्य संतोष पारखी,संजय आत्राम,सौ.वंदनाताई पेटकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आशिष राऊत व ग्रामस्थ व युवा मित्र धनंजय पाचभाई विजय लालसरे , राहुल ठाकूर , दिगंबर पाचभाई , दत्ताभाऊ लालसरे , विलास देठे , बालु पाचभाई , जगदीश चांदेकर , अमोल झाडे , किशोर जगताप , दिनेश जिवतोडे, मारोती पाचभाई रमेश गावंडे , मारोती गोंडे , गिरिधर राऊत ,अनिल आवारी , विजय भोयर, सुनील आवारी,निखिल देठे , राहुल पाचभाई व इतर वृद्ध मार्गदर्शक यावेळी उपस्थित होते .

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.