कानडा येथे साकारला लोकवर्गणीतून पांदण रस्ता

जि.प. सदस्या अरुणाताई खंडाळकर यांचे विशेष योगदान

0

भास्कर राऊत, मारेगाव: प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामध्ये लटकलेल्या आणि अनेक वर्षांपासून कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या कानडा ते मुक्टा या पांदण रस्त्याचे काम जि. प. सदस्या अरुणाताई खंडाळकर यांच्या सहकार्याने आणि गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या एकजुटीने लोकवर्गणीतून करण्यात आले. एकंदरीत जेथे शासन कमी पडते तेथे पदाधिकारी यांच्या सहकार्याने जनता प्रत्यक्षात कसे उतरविते हे सिद्ध करून दाखवले.

कानडा ते मुक्टा हा 4 किमीचा रस्ता. या रस्त्याने कानडा येथील अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. पावसाळ्यात हा रस्ता माती आणि चिखलाने पूर्णपणे माखलेला असतो. पावसाळ्यात वाहन तर सोडाच साधे पायदळ चालणेही कठीण होऊन जाते. अशातच या गावातील शेतकरी आपली समस्या घेऊन जि.प. सदस्या अरुणाताई खंडाळकर यांच्या दारी गेले.

तेथे त्यांनी आपली समस्या सांगीतल्यानंतर यांनी तात्काळ सध्या निधी उपलब्ध होऊ शकत नाही. पण आपण या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरता हा रस्ता वाहिवाटी योग्य करू शकतो. तुम्ही जर सहकार्य केले तर नक्कीच आपण सुरुवात करू असे सांगितले.

यावर शेतकरी तयार झाले आणि कामाला सुरूवात झाली. अरुणाताई यांनी जेसीबी तसेच इतर सर्व खर्च उचलला. तर गावकऱ्यांनी बाकी सहकार्य करण्याचे ठरवले. या पद्धतीने सुरुवातीला 1 किमीचे काम पूर्ण करण्यात आले. गावाने सहकार्य केले तर राईचा पर्वत सुद्धा होऊ शकतो हे एकदा पुन्हा सिद्ध झालेले आहे.

हे देखील वाचा:

फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगसाठी मोफत डेमो क्लासेस

Leave A Reply

Your email address will not be published.