नवरगाव येथे विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

मारेगाव तालुका होतोय आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध

0

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील नवरगाव येथील एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मृत व्यक्तीचे नाव संतोष अभिमान मोहुर्ले (40) असे आहे. मंगळवारी दि. 24 ऑगस्ट रोजी संतोष यांनी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्वतःचे राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते.  मात्र आज त्यांचा मृत्यू झाला.

संतोष अभिमान मोहुर्ले हे नवरगाव येथील रहिवाशी होते. संतोष हे विवाहित होते. मात्र त्यांचा घटस्फोट झाल्याने ते आपल्या आईवडीलांसोबत नवरगाव येथेच राहत होते. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांनी घरी विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे त्यांनी प्रकृती धासळली. विष पिल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळताच त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथे हलविण्यात आले होते. परंतु चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना आज बुधवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी संतोष यांचा मुत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण सध्या तरी कळू शकले नाही. यांच्या पश्चात आई,वडील, व भाई आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

आत्महत्येसाठी मारेगाव तालुका होतोय कुप्रसिद्ध
तालुक्यात सतत आत्महत्या होत असतानाच त्या थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना तसे न होता पुन्हा त्यात वाढच होत आहे. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. यावर समुपदेशन होणे गरजेचे असताना याकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे. आठवड्यातून कमीत कमी दोन आत्महत्या या ठरलेल्याच असून तालुका आत्महत्यामध्ये कुप्रसिद्ध होत आहे.

हे देखील वाचा:

पेटूर येथे रस्ता क्रॉस करणा-या शेतक-याला मिनी बसची धडक

संतापजनक: उपोषणकर्त्या बेरोजगार तरुणांची फसवणूक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.