ट्रॅक्टर चालकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

बुरांडा (खडकी) येथील घटना, रविवारी सकाळी उघडकीस आली घटना

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. आज सकाळी बुरांडा (खडकी) येथील एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. मृतकाचे नाव बळीराम कर्णू धुर्वे (37) आहे.

Podar School 2025

बळीराम धुर्वे हा बुरांडा (ख) येथील रहिवाशी होता. तो ट्रॅक्टर चालक होता. तसेच शेतमजुरीही करायचा. गेल्या 15-20 दिवसांपासून तो गावात नव्हता. काल शनिवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी तो गावी परतला होता. त्यानंतर रात्री 10-30 वाजताच्या सुमारास तो घरून निघून गेला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज रविवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान गावालगत असलेल्या विनोद चांदवडकर यांच्या शेतातील बंड्यात बळीरामचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बळीरामने गळफास घेतल्याचे कळताच पोलीस पाटील बबन जोगी यांनी मारेगाव पोलीस स्टेशन ला बाबत माहिती दिली.

मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वृत्त लिहेपर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री 11 ते 12 दरम्यान ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. बळीरामच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. मारेगाव तालुक्यात दर आठवड्यात सुमारे 2 आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहे. मात्र अद्यापही या गंभीर प्रश्नाकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना प्रशासनाचे.

हे देखील वाचा:

 

Comments are closed.