फुलोरा जंगलात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

नोकरीचे अपॉइंटमेन्ट लेटर मिळण्याआधीच मृत्यू, घात की आत्महत्या?

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा येथील एका तरुणाचा घोन्सा परिसरातील फुलोरा (उजाड) या जंगल परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या अंगावर मार लागल्याच्या खुणा आढळल्याने घातपाताचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की मृतक नीलेश सुधाकर चौधरी (27) हा रासा येथील रहिवाशी होता. रासा आणि घोन्सा यागावाच्या मध्ये फुलोरा (उजाड) हा जंगल परिसरा आहे. या ठिकाणी आज रविवारी दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास नीलेशचा फुलोरा (उजाड) या जंगल परिसरातील तलावाजवळील झुडुपात नीलेशचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही बाब लक्षात येतात पोलिसांना सुचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार नीलेशचे वडील सुधाकर यांचा काही वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या जागी अनुकंपावर नोकरी मिळवण्यासाठी नीलेश प्रयत्नशील होता. त्यातच त्याला येत्या दोन तीन दिवसांमध्ये अपॉइंटमेन्ट लेटर मिळणार होते. अशी ही माहिती मिळत आहे. मात्र त्याआधीच नीलेशचा मृतदेह आढळला आहे.

घात की आत्महत्या ?
मृतक नीलेशच्या अंगावर काही खुणा आढळल्याचा माहिती आहे. तसेच त्याच्या पायाला, पोटालाही मार आहे व कपडे विस्कटलेले होते. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. नीलेशचा मृतदेह विच्छेदानाकरीता पाठवण्यात आला असून त्याचा रिपोर्ट आल्यावर खरे कारण स्पष्ट होईल. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

विष प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

ट्रॅक्टर चालकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

Comments are closed.