रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालयातून नुकतंच जन्म झालेले बाळ चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा छडा लागला असून सदर बाळ आंध्रप्रदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या काही तासातच पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयातून मंगळवारी रात्री बाळ चोरीला गेले होते. गेल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी बाळ शोधण्यासाठी सूत्रे हलवायला सुरूवात केली. त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर बाळ आंध्र प्रदेशात असल्याची माहिती त्यांना मिळाली. एकूणच बाळ चोरणारे चोरटे आता पोलिसांच्या रडारवर आले आहे. या प्रकरणात कोण कोण सामील आहे हे अद्याप कळले नसले तरी बाळ चोरीत रुग्णालयात घिरट्या घालणारे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
एकूणच मंगळवारी रात्री उशीरा बाळाची चोरी झाली. वणी पोलीस मुख्य धाग्यापर्यत पोहचले त्यात बाळ हे आंध्र प्रदेशात असल्याची माहिती मिळाली आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. यात दामले फैल भागातील काही जण सामील असल्याची कुजबुज ऐकायला मिळाली. दरम्यान रुग्णालयात एकच गर्दी उसळली होती. अवघ्या काही तासातच पोलिसांची बाळ चोरी प्रकरणाचा छडा लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
(हे पण वाचा: ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी)
छडा लावण्यात पूर्वी डीबी पथकात असलेल्या पोलिसाची मुख्य भूमिका राहिली आहे. सदर बाळ दामले फैलातील दोघांनी मिळून ६० हजार रुपयात विकल्याची माहिती आहे. सध्या बाळ पोलिसांच्या हाती लागले असून ते परतीच्या मार्गावर आहेत.
वणी येथे रजा नगर हिंगणघाट येथून नुसरत अब्दुल सत्तार ही महिला प्रसुतीसाठी वणीत आली होती. रविवारी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास नुसरतच्या बिछान्यावरून बाळाची चोरी झाली. या घटनेने एकच खळबळ उडवली होती.