जामनी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट

गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार

सुशील ओझा, झरी: येथून दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या जामनी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीत दोषी कर्मचारी, सचिव व अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गाव हागणदारीमुक्त राहावे या उद्देशाने जामनी येथे काही दिवसांपूर्वी सार्वजनिक शौचालयाचे काम सुरू करण्यात आले. या बांधकामात 4 फूट पर्यंत पायव्याचे बांधकाम करून त्यात केवळ माती दगड टाकून ती बुजविण्यात आली आहे. बांधकामात चुरी, माती व हलक्या दर्जेच्या सिमेंट वापरण्यात आले. याबाबत सचिवांकडे तोंडी तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यांनी या कडे दुर्लक्ष केले

सदर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम गावाच्या जवळ होत आहे. टाकीचे काम निकृष्ट झाल्याने पुढे टाके लिक झाल्यास आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असून या प्रकरणी अभियंता व ग्रामसेवक यांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे गावातीलच प्रवीण लेनगुळे यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

गुरुनगर येथील क्रिकेट बेटिंग (सट्टा) अड्ड्यावर धाड

‘युग’च्या मदतीला धावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरु

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.