रोटरी क्लबतर्फे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मधुमेह तपासणी शिबिर

देशात एका दिवसात 1 मिलियन ब्लड शुगर टेस्टचे उद्दीष्ट

जितेंद्र कोठारी, वणी: मधुमेह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी तर्फे बुधवारी 29 सप्टेंबर रोजी जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील टिळक चौकात आयोजित या शिबिरात तब्बल 300 नागरिकांचे ब्लड शुगर टेस्ट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ इंडियातर्फे संपूर्ण देशात एका दिवसात 1 मिलियन ब्लड शुगर टेस्टचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीकडून मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

देशात प्रत्येक 10 नागरिकांमधून 4 जण मधुमेह (डायबिटीस) च्या समस्येने पीडित असल्याचे निष्कर्ष समोर आले आहे. वेळेवर तपासणी अभावी शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण अत्यधिक होऊन व्यक्ती ब्लड शुगर सारख्या आजारानं ग्रासल्या जातो. विशेषतः जेष्ठ नागरिकांना मधुमेहाचा धोका जास्त असतो. आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं.

हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो. योग्य औषधी, आहारात बदल आणि नियमित व्यायामद्वारे डायबिटीस नियंत्रणमध्ये ठेवता येते.

मोफत मधुमेह तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीचे अध्यक्ष रोटे. विनोद खुराना, परेश पटेल, निकेत गुप्ता, अनिल उत्तरवार, डॉ. गणेश लिमजे, डॉ. स्वप्निल गौरकार, अरुण कावडकर, मनीष बत्रा, शुभम मदान, श्रेयश निखार, कमलाकर बडवाईक, अंकुश भंडारी, तसेच आरोग्य सेवक अंकुश देवपुळे व निकिता जवादे सहकार्य करीत आहे.

हे देखील वाचा:

थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.