ग्रामीण रुग्णालय बनले समस्या केंद्र, टाकीत आढळल्या अळ्या

शिवसेने तर्फे 'जागते रहो' आंदोलनाला सुरूवात

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्र बनले आहे. रुग्णांची इथे गैरसोय होते. कर्मचा-यांची अनुपस्थिती असते, रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व मनमानी कारभारामुळे या ठिकाणची रुग्णसेवा संपुर्णतः कोलमोडुन आहे, असा आरोप करत शिवसेने तर्फे जागते रहो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 28 सप्टेंबर पासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून 13 दिवस हे आंदोलन चालणार आहे. या आंदोलनाद्वारा रुग्णालयातील कारभारावर लक्ष ठेवले जाणार आहे.

आज बुधवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी या आंदोलनाअंतर्गत ग्रामीण रुग्णालयातील पाण्याच्या टाकीची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली. दरम्यान या टाकीत घाण तसेच अळ्या आढळून आल्या. तसेच आज रुग्णालयात 2 महिलांची सिजर करण्यात आले. मात्र त्यांना त्यासाठी स्वत:जवळील पैसे खर्च करत औषधी बाहेरून आणावी लागली. याबाबतही शिवसेनेने जिल्हा अधिक्षकांकडे तक्रार केली.  

रुग्णांच्या आरोग्याशी खेळ – राजू तुराणकर
सध्या ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आम्ही जागते रहो आंदोलन सुरू केले आहे. मंगळवार पासून या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. आज सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता तिथे अळ्या आढळून आल्या. हा एक प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळच आहे. तसेच सिजरसाठी रुग्णांना पैसे खर्च करून बाहेरून औषधी मागवावी लागली. याबाबत आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
– राजू तुराणकर, शहरप्रमुख शिवसेना 

24 सप्टेंबर रोजी कायर येथील एका महिला प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. दुस-या दिवशी जन्मणारे बाळ पायाळू असून पोटात पाणी कमी असल्याने सिजर करण्यासाठी रुग्णाला दुसरीकडे भरती करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र रात्री चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय सलाईन लावल्यानंतर महिलेची नार्मल प्रसुती झाली. 

ग्रामीण रुग्णालयाच्या मागच्या बाजुला लेबर रूमचे बांधकाम चालू होते. बांधकामा दरम्यान खोदकाम करताना पाईप फुटला. त्यामुळे रुग्णांच्या वॉर्डमध्ये चार ते पाच दिवस पाणी उपलब्ध नव्हते. दरम्यानच्या काळात रुग्णांना बाहेरून पाणी आणुन आपली व्यवस्था करावी लागली होती. या संदर्भात शिवसेनेचे राजू तुराणकर यांनी जाब विचारला असता वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुलभेवार याची जबाबदारी माझी नाही म्हणत जबाबदारी झटकली. याशिवाय सेवा देणारे अनेक कर्मचारी अनुपस्थीत राहतात. असाही आरोप तुराणकर यांनी केला आहे.

या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून त्यासाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात शिवसेना वणी शहरप्रमुख राजू तुरणकर व युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे, युवासेना माजी शहर प्रमुख ललित लांजेवार, विभाग प्रमुख मंगल भोंगळे, युवासेना माजी शहर संघटक महेश पहापले, मनीष बतरा, बबन केळकर, मिलिंद बावणे, तुलसी तेवर, शाखा प्रमुख जनार्धन थेटे, राजेश पारधी, गणेश जुनगरे, मनीष नरपांडे, मुन्ना बोथरा, उमेश पोद्दार,मोंटू वाधवणी,राहुल झत्ते,हितेश गोडे, निखिल तुरणकर, विलास वांढरे, संदीप फाले, शंकर देरकर इ. सहभागी झाले आहे.

हे देखील वाचा:

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर…

थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

 

Comments are closed.