अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

राजूर येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर (कॉलरी) येथील एका 15 वर्षाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार राजूर कॉलरी येथील पीडित कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पीडितेची मुलगी वणी येथील एका शाळेत 10 व्या वर्गात शिकत आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु असल्याने ती घरीच असते. गुरुवार 30 सप्टेंबर रोजी घरातील सर्व लोकं झोपल्यावर मुलगी घरातून निघून गेली. सकाळी उठल्यावर मुलगी दिसून न आल्यामुळे आई वडील आणि दोन भावांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठंही मिळून आली नाही.

कोणीतरी व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून मुलीच्या आईने आपल्या मुलगा व शेजाऱ्यांना घेऊन वणी पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्द कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

हे देखील वाचा:

लिंगटी येथे शेतात बापलेकांवर कोसळली वीज, एकाचा मृत्यू

नवजात बाळाची विक्री करण्याचा डाव उधळला

Comments are closed.