राजूर विकास संघर्ष समितीचे विविध मागण्यांचे निवेदन

ग्रामसभेत चर्चा करून घेण्यात आले ठराव

जब्बार चीनी, वणी: कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून न झालेली ग्रामसभा दि.४ ऑक्टो ला घेण्यात आल्याने गावकरी मोठ्या संख्येने आपल्या समस्या घेऊन आले होते. यामध्ये राजूर विकास संघर्ष समितीने २० मागण्यांचे निवेदन ग्रामसभेत देऊन चर्चा घडवून आणून अनेक ठराव घ्यायला लावले.

Podar School 2025

गावातील अपूर्ण असलेले रस्ते पूर्ण करावीत, साई नगर व शहीद बिरसा मुंडा नगरात अद्यापही सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने त्या बांधाव्यात, संपूर्ण गावात एकही कचरा कुंडी नसल्याने कचरा इतरस्त्र फेकण्यात येते आणि तो सगळीकडे पसरतो याकरीता कचरा कुंड्या देऊन कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, ओला व सुका कचऱ्या साठी वेगवेगळ्या कचरा कुंडी द्याव्यात, आठवडी बाजारात कुठलीही व्यवस्था नसल्याने ओटे, रस्ते बांधून लाईट ची व्यवस्था करावी, गावातील चिकन, मटण व मच्छी मार्केट आठवडी बाजारात हलवावे, गावातील महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकाचे सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी हायमास्ट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरकुल यादीत पात्र लोकांची नावे समाविष्ट करावीत, घरकुल यादीत नावे असलेल्यांकडे जागा नसल्यास त्यांना दीनदयाळ योजनेंतर्गत जागा घेऊन द्यावी, वेकोलीच्या जागेवर अतिक्रमित लोकांना एकतर कायमचे पट्टे द्यावीत किंवा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांचा परिवाराला आर्थिक सहायता मिळवून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन देऊन समितीचे कॉ. कुमार मोहरमपुरी, साजिद खान व जयंत कोयरे यांनी चर्चा करून ग्रामसभेत ठराव घ्यायला लावले.

गावातील जनतेने ह्या ग्रामसभेत मोठ्या संख्येने भाग घेत रस्ते, नाल्या, घरकुल, नाली सफाई, आदी समस्या ठेवल्या.

हे देखील वाचा:

 

Comments are closed.