45 लाख लूटून पसार झालेले दरोडेखोर पाताळात की परग्रहावर?

6 महिन्यानंतरही पोलिसांना लागेना सुगावा...

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या घटनेला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही पोलिसांना दरोडेखोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. अवघ्या 45 सेकंदात 45 लाखांची रोकड भरलेली बॅग हिसकावून 4 ते 5 दरोडेखोर अखेर कुठे बेपत्ता झाले याचा शोध घेण्यास वणी पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखा सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दरोड्याचा तपास उप विभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांच्याकडे सोपविला. दुर्दैवाने काही दिवसांनी एसडीपीओ पुज्जलवार कार दुर्घटनेत जखमी झाले. त्यामुळे तपास लांबणीवर गेला.

20 मार्च 2021 रोजी येथील निळापूर मार्गावर घडलेल्या दरोड्याची घटनेचा वणी पोलीस आणि एलसीबीनी संयुक्तरित्या तपास सुरू केला होता. प्राथमिक तपासात दरोडेखोर राजस्थान येथील असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. त्यामुळे पोलिसांचा एक पथक राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात पाठविण्यात आला. जोधपूर येथे 13 दिवस तळ ठोकुनही पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. मात्र दरोड्याची योजना तयार करणार बाबूलाल नावाचा इसम पोलिसांच्या हाती लागला होता. पोलीस कोठडीत बाबूलाल कडून दरोडखोरांचे नाव,पत्ता वगळता पोलिसांना विशेष माहिती मिळाली नाही.

दरोड्यात सहभागी ओमप्रकाश, जितू, हनुमानाराम, सोमराज, सहीराम व कारचालक भंवरलाल हे कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर राजस्थानसह इतर राज्यात अनेक गुन्हा दाखल असल्याची माहितीही पोलिसांना बाबूलाल कडून मिळाली. दरोडा टाकल्यानंतर सर्व आरोपी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये पसार झाले. मात्र घटनेच्या 6 महिन्यानंतरही पोलिसांना एकही आरोपीचा सुगावा लागलेला नाही.

दरोडेखोर पाताळात किंवा परग्रहात गेले नसावे. एकाद्या चोरी, दारु तस्करी, जुगारच्या आरोपीना पकडून पोलीस आपली पाठ स्वतः थोपटून घेते. मात्र वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनेचा तपास करण्यास अपयशी राहण्याचा कलंक वणी पोलिसांच्या माथी राहणार की काय ? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

पथक राजस्थानला पाठवणार – पुज्जलवार
दरोड्यातील आरोपी हे राजस्थान येथील कुख्यात गुन्हेगार आहे. घटनेनंतर सर्व आरोपींचे मोबाईल बंद आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी लवकरच एक पथक पुन्हा राजस्थान येथे पाठविण्यात येईल. काही कारणास्तव तपास लांबणीवर गेला आहे. मात्र लवकरच आरोपीना अटक करू.
:संजय पुज्जलवार: उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी

हे देखील वाचा:

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

लैंगिक अत्याचाराला त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.