मारेगावात कनिष्ठ वीज अभियंत्याला गंभीर मारहाण

वीज देयका वरुन झाला वाद

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील वीज वितरण कंपणीची थकबाकी मोहिम सुरु आहे. यातच एका घटनेने सध्या खळबळ उडवली आहे. मारेगाव येथील बस थांब्या जवळ असलेल्या फोटो स्टुडियोच्या संचालकाने वीज थकबाकी वसूल करण्यासाठी आलेले कनिष्ठ अभियंता सस्नेह वासुदेव वासेकर यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. यात कनिष्ठ अभियंता डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ह्या घटनेची तक्रार मारेगाव पोलिसात दिली असुन, मारहाणकर्ता शेषराव मडावी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामीण रुग्नालय मारेगाव येथे फिर्यादीचा उपचार सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.