वणी ठाणेदार पदी श्याम सोनटक्के कायम

मारेगावचे ठाणेदार यांची पांढरकवडा येथे बदली

जितेंद्र कोठारी, वणी: येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या बदलीनंतर पोनि श्याम सोनटक्के याना वणी ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. मात्र गुरुवार 12 ऑक्टो. रोजीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये श्याम सोनटक्के यांची वणी पोलीस स्टेशनला कायम बदली करण्यात आली आहे.

उपविभागातील मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक जगदीश मंडळवार याना पांढरकवडा ठाणेदाराची जवाबदारी देण्यात आली आहे. तर वाहतूक नियंत्रण शाखाचे पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राजेश पुरी याना मारेगाव ठाणेदार बनविण्यात आले आहे.पांढरकवडा पो.स्टे ठाणेदार पोनि रामकृष्ण महल्ले याना जिल्हा वाहतूक शाखेचा प्रभार देण्यात आला आहे.

29 सप्टेंबरनंतर जिल्हा पोलीस दलात दुसऱ्यांदा खांदेपालट करण्यात आले आहे. वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव बदली तर शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांची कर्तव्यात कसुरीवरून उचलबांगडी करण्यात आली होती. एपीआय मुकुंद कवाडे हे शिरपूर ठाणेदाराच्या रेसमध्ये असताना त्यांना वाहतूक उप शाखा वणीचा प्रभार देण्यात आला. तर स्थानिक गुन्हा शाखेतील एपीआय गजानन करेवाड याना शिरपूर ठाणेदार म्हणून पाठविण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.