जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेताच्या बांधावर

आज बोटोणी परिसरात जिल्हाधिकारी यांची भेट

सुरेश पाचभाई, बोटोणी: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज बोटोणी क्षेत्रात भेट दिली. ग्रामपंचायत चिंचोनी बोटोणी येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाईन ७/१२ चे वाटप करण्यात आले. तसेच शासकिय आश्रम शाळा बोटोणी, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र बोटोणी, जिल्हा परीशद शाळा व pocra कृषी विभागाअंतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी गावातील नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.

जिल्हा अधिकारी अमोल येडगे हे यवतमाळ येथून सुमारे 12.30 वाजता बोटोनी ग्रामपंचयत कार्यालयात पोहचले. तिथे पोहोचताच ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना डिजिटल ऑनलाईन 7/12 चे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बोटोणी येतील शासकीय आश्रम शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी तिथल्या कामाचा आढावा घेतला. सोबतच त्यांनी गावामध्ये नवीनच झालेल्या प्राथमिक आरोग्य उप केद्रांची पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परीषद शाळेला भेट दिली.

जिल्हाधिकारी यांची बांधावर भेट
बोटोणी परिसरात क्षेत्रीय भेट देताना त्यांनी शेतकरी संजय वाल्मिकी महाराज यांच्या शेताला भेट दिली तिथे त्यांनी फळबाग व सागाचा झाडाची पाहणी केली. दरम्यान त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. दुपारी 3.30 वाजता बोटोणी येथून जिल्हा अधिकारी अमोल येडगे हे मारेगाव तहसील कार्यालयात पोहचले आणि तिथे त्यांनी आढावा बैठक घेतली त्यानंतर ते वणीसाठी रवाना झाले.

आढावा दौ-या दरम्यान वणीचे उपविभागीय अधिकीर डॉ. शरद जावळे, उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, ता. कृषी अधिकारी सुनील निकाळजे, विनायक जुमनाके, तलाठी गोरे, ग्रामसेवक तराळे, पंचायत समिती सदस्या सुनीता लालसरे, सरपंच सुनिता जुमनाके, उपसरपंच प्रवीण वनकर व गावातील नागरिक हजर होते.

हे देखील वाचा:

नवरात्री ऑफर: सोनीच्या टीव्हीवर 30 % पर्यंतची सूट

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

Comments are closed.