विविध क्षेत्रात कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान

नवरात्री निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे 9 महिलांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी महिला काँग्रेस वणी शहरतर्फे बुधवार 13 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवचे औचित्य साधून शहरातील विविध क्षेत्रातील 9 कतृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. शेतकरी जिनिंग सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंब प्रमुख नसताना कुटुंब जगविण्यासाठी धडपड करणाऱ्या या आदीशक्तींचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Podar School 2025

गौरविण्यात आलेल्या महिलांमध्ये वयोवृद्ध समाजसेवक उमरावबाई गेलडा, डॉ. शोभा सुराणा, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या साधना गोहोकार, महिला बचत गटातून कु. पौर्णिमा शिरभाते, बँकिंग क्षेत्रात कार्यरत स्नेहलता लिमजे, आशा वर्कर वर्षा बांडे, तसेच परिस्थितीशी झगडून छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या पाल्यांचा पालनपोषण व शिक्षण करणाऱ्या बेबी पानघाटे, शीला धानोरकर, मुन्नवर सुलताना यांचे समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महिलांचे सत्कार कार्यक्रमाच्या आयोजक राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सविता ठेपाले, विजया आगबत्तलवार, आशा टोगे, प्रतिमा वंजारी, वैशाली तायडे, किरण मडावी, सोनाली , सीमा ताटेवार, बेबी नक्षिणे, मंदा दानव यांनी सर्व महिलांचे सन्मान करून त्यांचे कौतुक केले.

हे देखील वाचा:

गुरुवारी होणार प्रभाग क्रमांक 4 मध्ये लसीकरण शिबिर

जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेताच्या बांधावर

Comments are closed.