कोरोना मृतकाच्या वारसांना मिळणार 50 हजारांची मदत

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन

जितेंद्र कोठारी, वणी: कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून अनुदान वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गामुळे देशात आतापर्यंत 4 लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो मुलं अनाथ झाली आहेत. त्यामुळे कोरोना आजाराने मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे दि. 30 जून 2021 चे आदेश आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण यांनी दि. 11सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात जिल्हा स्तरावर समित्या नेमण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी आहे. त्यामुळे सानुग्रह अनुदान मिळणेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

वारे नगरपालिकेचे भाग 6: 5 वर्षात झाले तब्बल 5 नगराध्यक्ष

Comments are closed.