परमडोहचे शिक्षक नीलेश सपाटे टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित
यापूर्वीही विविध पुरस्काराने गौरव
तालुका प्रतिनिधी, वणी: सोलापूर येथील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन द्वारा देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय टीचर इनोव्हेशन अवॉर्डने परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक निलेश सपाटे यांना लोणावळा (पुणे) येथे नुकतेच गौरविण्यात आले. शिक्षक सपाटे यांच्या उपक्रमाचे शीर्षक ‘वर्तमानपत्रातील आव्हानांची, जीवनाशी सांगड’ होते. थोर शास्त्रज्ञ अरविंद नाथू, साखर आयुक्त शेखर गायकवाड, डिजीपी अतुलचंद्र कुलकर्णी, डॉ.शकुंतला काळे, विकास गरड, शिक्षणतज्ञ व लेखक डॉ. ह. ना.जगताप, दत्तात्रय वारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यंदा राष्ट्रीय स्तर इनोव्हेशन अवॉर्ड करिता भारताच्या विविध राज्यांतून 1200 शिक्षकांनी नवोपक्रम सादर केले. पैकी 103 नवोपक्रमाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये परमडोहच्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक निलेश सपाटे यांच्या नवोपक्रमाचा समावेश आहे. शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सपाटे हे सतत प्रयत्न करीत असतात.
शिक्षक सपाटे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, वणीचे गटविकास अधिकारी गायनार, गटशिक्षणाधिकारी देवतळे, सरपंच मधुकर वाभीटकर, संदीप थेरे, शाळा समिती अध्यक्ष सूर्यभान कोडापे, केंद्र प्रमुख विनोद उईके, मुख्याध्यापक हंसराज काटकर यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
हे देखील वाचा:
प्रिन्स लॉनजवळ विचित्र अपघात, भरधाव अल्टो कारची दुचाकी, कार व अॅटोला धडक
Comments are closed.