नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

● मारेगाव व झरीजामणी नगर पंचायतीसाठी 21 डिसेंबरला मतदान.... नगरपंचायत क्षेत्रात आचार संहिता लागु

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवार 24 नोव्हे. रोजी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, राळेगाव, कळंब, बाभूळगाव, मारेगाव व झरीजामणी या 6 नगर पंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक सूचना जाहिर होताच वरील नगरपंचायत क्षेत्रात आचार संहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवार 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द केल्या जाईल. मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात येणार आहे. दि 1 डिसेंम्बर ते 7 डिसेंम्बर 2021 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या
वेबसाईटवर इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक 8 डिसें रोजी सकाळी 11 वाजता पासून प्रसिध्द करण्यात येईल.

उमेदवारांना सोमवार दि. 13 डिसें. ला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल. त्यानंतर लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार 21 डिसेंम्बर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येईल. दि. 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरवात करण्यात येणार आहे.

वणी उपविभागातील मारेगाव नगरपंचायतीचे कार्यकाल 26 नोव्हे. 2020 रोजी संपुष्टात आलेले आहे. तर झरीजामणी नगर पंचायतीचे कार्यकाल 26 नोव्हे. 2021 रोजी संपुष्टात येणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.