सावधान ! मुकूटबन परिसरात दिसला वाघ दिसला…

परिसरात वाघाची दहशत कायम

0

रफिक कनोजे, मुकुटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन परिसरातील शिवारात गुरुवारी संध्याकाळी शेतकऱ्यांना वाघ दिसला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. परिणामी वनविभागाने जंगलात, शिवारात ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

झरी तालुक्यातील मुकूटबन शिवारातील नंदु मंदुलवार यांचे शेतात पट्टेदार वाघ दिसल्यामुळे गावक-यांमध्ये भितीचे निर्माण झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता शेतातील कापुस वेचणीचे काम करून नंदु मंदुलवार याचे बैलगाडीत बसुन घरी परत येत असताना सौ. अकबरी शफीखा पठाण, सुमन बर्लावार, सुनिता नंदु मंदुलवार, सय्यद जायेदा, सुलोचना कनकोटलावार ह्यानी अवघ्या पाच फुटावर वाघ पाहिला असे सांगितले.

आठ दिवसांपुर्वी अनेक लोकांना शेख फरीद बाबाच्या व बीएसएनएल ऑफिसच्या परिसरात वाघ दिसल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. ही बाब ताजी असताना मुकुटबन येथील शेतकरी नंदु मंदुलवार व पाच महिलाना ला वाघ दिसला. त्यामुळे ते घाबरून आले. सदर माहिती मिळताच रफीक कनोजे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी वारे ह्याना मोबाइल वरुन संपर्क करुन कल्पना दिली. त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी वारे यानी ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली. आता मुकूटबन शिवारात वाघ दिसल्याने नागरीकांच्या भीतीत भर पडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.