आज वणीत प्रसिद्ध नाटककार ठेंगडी यांचे व्याख्यान

नगर वाचनालय सभागृहात होणार व्याख्यान

0

सुनील बोर्डे, वणी: स्थानिक विदर्भ साहित्य संघ शाखेच्या वतीने प्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक प्रभाकर ठेंगडी ( नागपूर ) यांचे व्याख्यान दि. 17 नोव्हेंबर, शुक्रवार रोजी रात्री 7 वाजता नगर वाचनालय सभागृहात आयोजिण्यात आले आहे. स्व. वामनराव विष्णुपंत वैद्य (परतवाडा) यांच्या स्मृती निमित्त हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा विषय ‘श्यामची आई-कालची, आजची आणि उद्याची’ असा आहे.

श्यामच्या आईचे हे स्मृतीशताब्दी वर्ष आहे हे उल्लेखनीय. व्याख्यानाचे प्रायोजक सौ. मंजिरी व सुधीर दामले आहेत. अत्यंत उद्बबोधक अशा या व्याख्यानाचा लाभ बंधुभगिनींनी बहुसंख्येने घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.