हटवांजरी येथे शेतमजुराची विश प्राशन करून आत्महत्या

चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

सुरेश पाचभाई, बोटोणी: विश प्राशन केलेल्या शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कवडू भीमा मडावी (55) असे मृताचे नाव असून त्यांनी शनिवारी विश प्राशन केले होते. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

सविस्तर वृत्त असे की कवडू भीमा मडावी हा हटवांजरी येथे राहायचा. तो शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. शनिवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास कवडू यांनी गावाबाहेर जाऊन विषारी औषध प्राशन केले होते. याची माहिती मिळताच कुटुंबीयांना त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णायलात उपचारासाठी आणले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते.

कवडू यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. मात्र सोमवारी मध्यरात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कव़डू यांच्यावर हटवाजरी येथे संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहे कवडू यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. कवडू यांचे वडील मयत असून त्यांच्या नावावर काही शेती असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

शेतात तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

साखरा (दरा) येथील शेतक-याची शेतात आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.