नवे निर्बंध लागु, मात्र अंमलबजावणी यंत्रणाच शिथिल

वणी विभागातील नागरिक सैराट... महसूल, नगरपरिषद व पोलीस प्रशासनकडे कर्मचाऱ्यांची कमतरता

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोना व ओमायक्रोन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने रविवार 9 जाने. रात्रीपासून नवे निर्बंध लागू केले आहे. मात्र निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे नवे निर्बंध फक्त देखावा ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य शासनाने रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी तर सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी लागू केल्याची घोषणा केली आहे. सोमवार पासून धार्मिक स्थळे, जिम, स्पा, स्विमिंग पूल, मैदाने, पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद तर हॉटेल, मॉल्स, थिएटर, खाजगी कार्यालय, सलून हे 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यातील सर्व शाळा, कॉलेज व कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले आहे. लग्न समारंभात 50 जणांना तर अंत्यसंस्कारमध्ये 20 लोकांना उपस्थित राहता येईल.

हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने व खाजगी कंपन्यांमध्ये कोरोना लसीची दोन्ही डोज घेतलेल्या कर्मचाऱ्यांना काम करणाऱ्याची मुभा देण्यात आली आहे. त्या सिवाय इतर अनेक निर्बंध राज्य शासनाकडून लावण्यात आले आहे.
वणी शहराची लोकसंख्या तब्बल 80 हजार आहे. तर ग्रामीण भागातून विविध कामासाठी शहरात दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक दाखल होतात.

सद्य स्थितीत नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती नाहीशी झाली आहे. बहुतांश लोकांनी मास्कला तिलांजली दिली आहे. सोशल डिस्टनसिंग नावाच्या कायद्याचा खाजगी क्षेत्र तर दूर शासकीय कार्यालयानासुद्दा विसर पडला आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, न्यायालय, सेतू सुविधा केंद्र, बँका, नगर परिषद व इतरही शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना नियमांचा पालन केले जात नाही. तर सर्व साधारण नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे सांगणार कोण?

शहर व ग्रामीण भागाची लोकसंख्या ग्राह्य धरून वणी पोलीस ठाण्यात 100 ते 110 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र सद्यस्थितीत वणी पोलीस ठाण्यात 48 जणांचा स्टाफ उपलब्ध आहे. वाहतूक उप शाखेतही आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली नाही. तहसील व नगरपरिषद प्रशासनसुद्दा कर्मचाऱ्याच्या कमतरतेसोबत जेमतेम काम करत आहेत. त्यामुळे नवे निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करणे अवघड होणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फक्त आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, नर्सेज आपले कार्य चोखरीत्या बजावत असल्याचेही दिसून येत आहे.

हे देखील वाचा:

बँकेतून काढलेल्या पैशावर गावातीलच तरुणाचा डल्ला

हरबरा कटर मशिन अवघ्या 280 रुपयांमध्ये

 

Comments are closed.