हातात तलवार घेऊन तरुणाचा धुमाकूळ

रंगनाथ नगर येथील घटना, आरोपीच्या आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणा-या तरुणाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. नीलेश दुर्वास पाटील (23) रा. रंगनाथ नगर असे आरोपीचे नाव आहे.

वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शाम सोनटक्के यांना मुखबिरकडून रंगनाथ नगर येथे एक युवक तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना रंगनाथ नगर येथे पाठवले. तेव्हा आरोपी नीलेश पाटील हा सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याचे आढळून आले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला शिताफीने अटक करून त्याच्या ताब्यातून 71 सेंटीमीटर लांबीची म्यानसह तलवार जप्त केली. आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 4, 25 व शस्त्र अधिनियमच्या कलम 135 अनव्ये गुन्हा दाखल केला.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व पोनि शाम सोनटक्के यांच्या आदेशानुसार स.फौ. डोमजी भादीकर, सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, हरींदर भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

ऑनलाईन भामट्यांचा सेवानिवृत्त प्राचार्याला तब्बल 37 लाखांचा गंडा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.