गणेशपूर येथे महिलांच्या स्नेहमिलनाचे आयोजन
स्त्रीयांनी आत्मविश्वासाने जगणे गरजेचे - किरण देरकर.... महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रामाता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्त अभिवादन व स्नेहमिलन सोहळा गणेशपूर येथील चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ सभागृहात पार पडला. यावेळी उपस्थित महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी गणेशपूर येथील आशा वर्कर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
य़ा कार्यक्रमाच्या उद्घाटिका एकविरा महिला बॅंकेच्या अध्यक्षा किरण देरकर होत्या तर अध्यक्षा विजया ठाकरे होत्या. गीता उपरे, विणा पावडे, आशा खामनकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ऍड करिष्मा किन्हेकार व ऍड स्नेहल पाटील यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. मान्यवरांनी स्त्री संघटन, एकात्मका व महिलांची सामाजिक बांधिलकी काय असली पाहिजेत यावर विचार व्यक्त केले.
स्त्रियांनी आत्मविश्वासाने जगणे गरजेचे – किरण देरकर
आजची स्त्री केवळ चूल आणि मुल इतक्या पुरती मर्यादित राहिली नसून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियां पुरुषांच्या बरोबरीने आहेत. किंबहुणा एका पाऊल पुढेच म्हणता येईल. मात्र अनेक स्त्रिया केवळ आत्मविश्वासाच्या अभावी मागे राहतात. जो पर्यंत त्या स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करत नाही, तो पर्यंत त्या तोपर्यंत समाज बदलणार नाही. त्यामुळे महिलांनी आत्मविश्वासाने जगणे गरजेचे आहे.
– किरण देरकर, सामाजिक कार्यकर्त्या
कार्यक्रमाचे संचालन योगिता कुबडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रिना मालेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वृषाली खानझोडे, मीनाक्षी मोहिते, सविता राजूरकर, रेखा रासेकर, स्नेहा लालसरे, मंगला देठे, पूजा पानघाटें, रिना मालेकर, प्रणाली चिडे, गौरी तिरानकार, शारदा ढेंगळे, उज्वला लोखंडे, शोभा मोहिते, सविता मेश्राम, नंदा वाढरे, सरिता लिहीतकर, अनिता मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील महिला उपस्थित होत्या.
Comments are closed.