नाझ बॅटरीचे संचालक फहीम शेख यांचे निधन

कब्रिस्तान येथे दुपारी 1 वाजता होणार अंत्यविधी

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एक्साईड बॅटरीचे अधिकृत वितरक व नाझ बॅटरीचे संचालक फहीम शेख (49) यांचे शुक्रवार 18 फेब्रुवारी रात्री 10.25 वाजता निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज शनिवार दुपारी 1 वाजता दरम्यान शहरातील कब्रिस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. फहीम शेख मागील अनेक वर्षांपासून नांदेपेरा रोडवरील तिरुपती अपार्टमेंटमध्ये राहत होते. एक वर्षांपूर्वी लक्ष्मीनगरमध्ये बांधलेल्या नवीन घरात ते सहकुटुंब राहायला गेले होते. अत्यंत मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे फहीम शेख यांना अचानक किडनीचा आजार उद्भवला. अनेक ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री त्यांची तब्येत खालावली आणि ह्र्दयविकाराचा झटका आला.  यात त्यांचे निधन झाले. फहीम शेख यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा तसेच मोठ्या संख्येने आप्त परिवार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.