मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी अर्चना बोदाडकर यांची नियुक्ती
मनसे महिला शाखेला करणार आणखी सशक्त
जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष पदी वणी येथील अर्चना विलान बोदाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी अर्चना बोदाडकर याना नियुक्ती पत्र देऊन सत्कार केले.
येथील मनसे कार्यालयात सोमवार 7 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, तृप्ती राजू उंबरकर, महिला शहर अध्यक्ष विद्या हिवरकर, उपाध्यक्ष ज्योती मेश्राम, धनंजय त्र्यंबके, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रविण डाहुले, गीतेश वैद्य, शारदा दोडके, माया महाकूलकर, शारदा ठाकरे, मनीषा बोधाणे, स्नेहलता कुचनकर, छाया कारेकर, प्रतिभा पानघाटे, तृप्ती बोकडे, विशाखा मत्ते, अर्चना येसेकर, वंदना गिन्नलवार, अर्पिता गिन्नलवार, चिकटे, वीणा पानघाटे, माला मोहूले, लीना खडसे, मीना खामनकर, सातभाई, बंडू येसेकार, विलन बोदाडकर, शंकर पिंपळकर, सारंग चिंचोलकर, सुनील पानघाटे, विठ्ठल हेपट, सदानंद बोधाणे, विठ्ठल पाचभाई, अरविंद राजूरकर, श्रीपाद धोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंदराव थेरे यांनी केले.
Comments are closed.