डीएव्ही पब्लिक स्कूलबाबत पालकांनी घेतली आमदारांची भेट

शाळा स्थानांतरणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील निलजई कॉलोनी, सुंदर नगर येथील डीएव्ही पब्लिक स्कूल बाबत पालकांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या सोडवण्यासाठी साकडे घातले. सध्या काही कारणांमुळे घुग्घूस येथे स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा वणी व परिसरातील 400 ते 500 विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. सदर शाळा वणी परिसरातच असावी यासाठी शासन स्तरावर मदत करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या संस्थेची शाळा वणी परिसरातच राहावी यासाठी कॅम्पेन राबवण्यात येणार असून याला अधिकाधिक पाठिंबा द्यावा असे आर्जव पालकांनी केले आहे.  

देशातील सुप्रसिद्ध डीएव्ही कॉलेज मॅनेजमेन्ट कमिटी द्वारा संचालित ही शाळा आहे. या संस्थेच्या महाराष्ट्रात अवघ्या 12 शाळा आहेत. वेकोलि कर्मचा-यांच्या पाल्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे हा उद्देश ठेऊन सुंदर नगर येथे 1997 साली ही शाळा सुरू करण्यात आली. या संस्थेची यवतमाळ जिल्ह्यातील ही एकमेव शाखा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या शाळेची उत्कृष्ट शिक्षणासाठी ओळख आहे. त्यामुळे वणी व परिसरातील सुमारे 400 ते 500 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे. मात्र सध्या ही शाळा घुग्घुस येथे स्थानांतरीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

काय आहे स्थानांतरण प्रकरण?
उत्कृष्ट शिक्षण, सोयीसुविधा, शिक्षणासाठी अत्याधुनिक साहित्य, उत्कृष्ट शिक्षक, कलागुणांना प्रोत्साहन, ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे वणी परिसरात ही शाळा प्रसिद्ध आहे. इथे प्रवेशासाठी पालकांची पहिली पसंती असते. सुंदर नगर हा परिसर वेकोलिच्या खाणीच्या क्षेत्रात असल्याने शाळेखालील जमिन कोळसा उत्पादनामुळे पोकळ झाली आले. कोळसा काढण्याच्या प्रक्रियेत होणा-या ब्लास्टमुळे या शाळेच्या भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पुढला धोका लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने सदर शाळा घुग्घुस येथे स्थानांतरीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

ही माहिती समोर येताच पालक संतप्त झाले आहे. एक उपक्रमशील शाळा परिसरातून दुस-या जिल्ह्यात जाऊ नये यासाठी पालक प्रयत्न करीत आहे. शाळा घुग्घुसला गेल्यास 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना व पालकांना याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या शाळेचे स्थानांतरण रोखावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यासाठी पालकांनी पालकांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेतली  खासदार बाळू धानोरकर यांची वरोरा येथे भेट घेतली. दरम्यान खासदारांनी त्यांना पर्यायी जागा, इत्यांदी तांत्रिक समस्या दूर करून ही शाळा जिल्ह्याबाहेर जाऊ न देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असे आश्वासन दिले आहे. निवेदन देताना मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.